Rajan Salvi : ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर स्पष्टच म्हणाले…
आमदार राजन साळवी हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. या चर्चांवर राजन साळवी यांनीच पत्रकार परिषद घेत सर्व प्रश्नांची उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.
कोकणातील उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. या चर्चांवर राजन साळवी यांनीच पत्रकार परिषद घेत सर्व प्रश्नांची उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांवर राजन साळवी म्हणाले, “मी ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याची मोठी खंत, वेदना मला आणि मतदारसंघातील माझ्या जनतेला आहेत. मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे हे मला तुमच्या माध्यमातून समजतंय”, असं राजन साळवी म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, मी भाजपच्या वाटेवर जाण्याच्या बातम्या, चर्चा या सर्व अफवा आहेत. मी निष्ठावंत सैनिक आहे. बाळासाहेबांचाच सैनिक राहणार. या बाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही.” असं वक्तव्य करत राजन साळवी यांनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत स्पष्टीकरण दिले आहे. भाजपकडून ऑफर आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर राजन साळवी म्हणाले, “पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारणारच. तसा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असू शकतो. ते भाजप नेत्यांच मत आहे”