Rajan Salvi : राजन साळवी ठाकरेंची साथ खरंच सोडणार? पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर म्हणाले, ‘योग्य वेळी…’
गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत्या. मात्र या चर्चांवर राजन साळवी यांनी काल पत्रकार परिषद घेत सर्व प्रश्नांची उत्तर दिली होती
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पदाधिकाऱ्यांशी ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी काल संवाद साधला आहे. दरम्यान, संवाद साधत असताना माझ्यावर अन्याय झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं असल्याचे राजन साळवी म्हणाले. तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचेही यावेळी वक्तव्य करत राजन साळवी यांनी अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत्या. मात्र या चर्चांवर राजन साळवी यांनी काल पत्रकार परिषद घेत सर्व प्रश्नांची उत्तर दिली होती. यावेळी . ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांवर राजन साळवी म्हणाले, “मी ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याची मोठी खंत, वेदना मला आणि मतदारसंघातील माझ्या जनतेला आहेत. मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे हे मला तुमच्या माध्यमातून समजतंय”, असं राजन साळवी म्हणाले होते. मात्र आज पुन्हा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे राजन साळवी म्हणाले.