उद्धव ठाकरे हे स्वबळावर निवडणूक लढणार? ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

उद्धव ठाकरे हे स्वबळावर निवडणूक लढणार? ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

| Updated on: Aug 16, 2023 | 5:16 PM

VIDEO | उद्धव ठाकरे हे स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे मोठं विधान ठाकरे गटाच्या नेत्यानं केले आहे. ठाकरे गटाचे नेते आमश्या पाडवी हे मुंबईत माध्यमांशी बोलत असताना नेमकं काय म्हणाले?

मुंबई, १६ ऑगस्ट २०२३ | उद्धव ठाकरे हे स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे मोठं विधान ठाकरे गटाच्या नेत्यानं केले आहे. ठाकरे गटाचे नेते आमश्या पाडवी हे मुंबईत माध्यमांशी बोलत असताना म्हणाले, आज उद्धव ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका बोलवल्या आहेत. आपण महाविकास आघाडी म्हणून सध्या तरी निवडणुका लढवण्याचा ठरवलं आहे आणि त्यानुसार तयारी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या बैठकीला जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख आणि महत्त्वाचे नेते आमच्या मतदारसंघातील उपस्थित होते. पक्ष संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे यांनी सूचना केल्या आहेत. उमेदवारा संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही, शरद पवार यांनी अद्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे ते अजूनही महाविकास आघाडीत आहेत, असेही ठाकरे गटाचे नेते आमश्या पाडवी यांनी म्हटले. तर स्वबळावर लढाईची तयारी संदर्भात निर्णय उद्धव ठाकरे घेतील मात्र त्या संदर्भात चर्चा न करता महाविकास आघाडी म्हणून तयारी करत असताना पक्ष संघटना मजबूत करण्याच्या सूचना केल्या आहेत, असेही आमश्या पाडवी यांनी ठामपणे सांगितले आहे.

Published on: Aug 16, 2023 05:16 PM