बदलाचे वारे वाहतायत म्हणत आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सरकारवरही केलं भाष्य, म्हणाले…
VIDEO | ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया
मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. “आजचं बहुमत काँग्रेसला मिळालं आहे. आज वेगळ्या राजकारणाला सुरुवात होत आहे. बदलाचे वारे आता वाहू लागले आहेत आणि ते आता दिसतंय. जे 40 टक्क्याचं सरकार गेलेलं आहे. पण त्याहून अधिक भ्रष्ट सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे ते देखील आम्ही घालवू, याची आम्हाला खात्री आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तर “कर्नाटकात अनैतिक भ्रष्ट सरकार जे लोकांनी घालवलं आहे, तसंच महाराष्ट्रातीलही घटनाबाह्य, अनैतिक आणि असंविधानिक सरकार बसलेलं आहे. हे सरकार फक्त बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स यांचीच मदत करणारं सरकार आहे. ते देखील महाराष्ट्रातील जनता पळवून लावू शकते”, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, भाजपने त्यांचा पराभव मान्य केला असून राज्यातील भाजप नेते यावर बोलणं टाळताय. तर मविआचे नेते देखील टोला लगावताना दिसताय अशातच आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतून भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी आपण त्यांच्यावर कधीच बोलत नाही. आपण कुणावरही वैयक्तिक टीका करत नाही, असं म्हटलं.