‘म्हणून निरमाने भ्रष्टाचाऱ्यांना धुतलं’, अंबादास दानवे यांचा सताधाऱ्यांवर हल्लाबोल
VIDEO | 'ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ते भाजपमध्ये जाऊन पतितपावन झाले', अंबादास दानवे यांची जहरी टीका
मुंबई : राज्यात भाजपने ईडी, सीबीआची कारवाई ज्यांच्यावर केली, जे भ्रष्टाराने बरबटले आहेत तेच लोक आज सत्तेवर आहेत. यापार्श्वभूमीवर मविआच्या वतीने एक आंदोलन करण्यात आल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. दरम्यान, राज्यातील भ्रष्टाचारी गद्दार लोकांना निरमा पावडरने धुतलं गेल्याची खोचक टीकाही अंबादास दानवे यांनी केली आहे. सत्ताधारी पक्षातील एका आमदारानेच गेल्या काही दिवसांपूर्वी एक खळबळजनक विधान करून असे म्हटले की, आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे आणि आम्ही भ्रष्टाचारी लोकांना स्वच्छ करतो. याच निरमा पावडरचा वापर करत राज्यातील भ्रष्टाचारी आणि गद्दार लोकांना स्वच्छ करून सरकारमध्ये बसवले आहे. अशा लोकांच्या प्रतिमा घेऊन प्रतिकात्मक स्वरूपात त्याला निरमाने स्वच्छ करून धुवून काढले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत ते आज भाजपमध्ये गेलेत आणि ते पतितपावन झाले आहेत. म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.