‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठवाड्याशी काही देणंघेणं नाही’, कुणी केला हल्लाबोल?
VIDEO | ठाकरे गटाच्या नेत्याचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठवाड्याच्या मातीशी काय देणंघेणं होतं म्हणून त्यांनी येथेही राजकारण केले'
मुंबई, १७ सप्टेंबर २०२३ | ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठवाड्याशी काही देणंघेणं नाही’, असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर अंबादास दानवे यांनी टीका केली. तर उद्धव ठाकरे यांच्यामुळे एकनाथ शिंदे यांना ओळख मिळाली असल्याचेही म्हणत त्यांनी टीका केली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी एका शासकीय कार्यक्रमात हजेरी लावली होती. या शासकीय कार्यक्रमात मोठी राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ‘मराठवाडा मुक्ती संग्राम या दिवशी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. हिंदुस्थान पेक्षा एक वर्ष एक महिना २ दिवस मराठवाडा स्वातंत्र झाला आहे. यासाठी अनेकांचं बलिदान आहे. पण मुख्यमंत्र्यांना मराठवाड्याच्या मातीशी काय देणंघेणं होतं म्हणून त्यांनी येथेही राजकारण केले’, असे दानवे म्हणाले.