मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपची भांडी घासतात अन् त्यांचंच गुणगान गातात, कुणी केला हल्लाबोल?
VIDEO | कितीही रावण एकत्र आले तरी २०२४ च्या निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करत विरोधकांवर टीकास्त्र डागलं. या टीकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३ | कितीही रावण एकत्र आले तरी २०२४ च्या निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करत विरोधकांवर टीकास्त्र डागलं. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हा शब्द उच्चारू नये. स्वयंघोषित शिवसेनेचा मुख्यमंत्री होतात आणि भांडी भाजपची घासतात आणि गुणगान देखील भाजपच्या नेत्यांचं करतात, असे भाष्य करत संजय राऊत यांनी शिंदे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पुढे राऊत असेही म्हणाले की, ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असू शकत नाही थोडा तरी स्वाभिमान असेल तर महाराष्ट्राविषयी बोला, स्वतःच्या पक्षाविषयी बोला. पण रोज सकाळी उठल्यापासून तुम्ही मोदीं शहाच स्त्रोत्र सुरू करताय, असे म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.