भाजप घाबरली ! संजय राऊत यांचा ट्विटरवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल

भाजप घाबरली ! संजय राऊत यांचा ट्विटरवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल

| Updated on: May 02, 2023 | 10:57 AM

VIDEO | ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्वीट करून भाजपवर निशाणा, काय केलं ट्विट बघा

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्वीट करून भाजपवर निशाणा साधल्याचे समोर आले आहे. भाजप १० वर्ष मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याचं धाडस करणार नाही, असे म्हणत भाजप घाबरली असल्याच्या आशयाचे ट्वीट करत संजय राऊत यांनी भाजपला पुन्हा डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत असे म्हटले की, ‘महाविकासआघाडीच्या कालच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी आणि प्रतिसाद पाहता भाजपा अजून दहा वर्षं तरी मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याचं धाडस करेल असे दिसत नाही. पण त्या आधीच महाराष्ट्र आणि दिल्लीत सत्तांतर नक्की आहे. दारूण पराभव निश्चित आहे. मुंबई शिवसेनेचीच!’ असे म्हणत संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

 

 

Published on: May 02, 2023 10:56 AM