नाची, डान्सर आणि… नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची अमरावतीत बोलत असताना जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. बळवंत वानखेडे विरोधात नाचीची लढाई नाही, देशाची लढाई आहे. नाची, डान्सर, बबलीशी बळवंत वानखेडे यांची लढाई नाही...
अमरावतीतून भाजपने नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची अमरावतीत बोलत असताना जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. बळवंत वानखेडे विरोधात नाचीची लढाई नाही, देशाची लढाई आहे. नाची, डान्सर, बबलीशी बळवंत वानखेडे यांची लढाई नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणांवर बोलताना केलं. ‘बळवंत वानखेडे विरोधात नाची, डान्सर, बबलीशी नाही तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी आहे. ही लढाई मोदी विरूद्ध उद्धव ठाकरे, ही लढाई मोदी विरूद्ध शरद पवार, ही लढाई मोदी विरूद्ध राहुल गांधी आहे.’ असे राऊतांनी म्हणत हल्लाबोल केलाय. पुढे ते असेही म्हणाले, ज्या बाईने मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला. मातोश्री आणि हिंदूत्वाबद्दल अपशब्द वापरलेत. त्या बाईचा पराभव करण शिवसैनिकांचं पहिलं आणि नैतिक कर्तव्य आहे.