'देवेंद्र फडणवीस यांनी त्याच स्वप्नात रहावं', ठाकरे गटाच्या नेत्याचा सूचक इशारा काय?

‘देवेंद्र फडणवीस यांनी त्याच स्वप्नात रहावं’, ठाकरे गटाच्या नेत्याचा सूचक इशारा काय?

| Updated on: May 19, 2023 | 1:43 PM

VIDEO | कर्नाटकची पुनरावृत्ती महाराष्ट्रातच नाही तर देशात होणार, कुणी दिला भाजपला इशारा?

अकोला : महाराष्ट्रात आतापासून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. संभाव्य मविआचा जागावाटपाचा प्रयोग आणि भाजपला रोखण्यासाठी तीनही पक्ष चाचपणी सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मविआमधील जागा वाटप कसं होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. अशातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये २८ पैकी २५ जागांवर नक्कीच विजयी होणार, असा विश्वास व्यक्त करत नुकत्याच झालेल्या कर्नाटक निकालाकडे लक्ष देऊ नका, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपच्या विनोद तावडे यांची जी समिती आहे, त्यांनी आव्हान दिले होते की, राज्यात मविआचे ३८ जागा निवडून येतील. यानतंर आता ४० जागांवर विजय कसा होईल असे आमचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्याच स्वप्नात रहावं’, असे भाष्य करत खोचक टोलाही लगावला आहे तर कर्नाटकची पुनरावृत्ती महाराष्ट्रातच नाही तर देशात होणार असल्याचा विश्वासही अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. तर येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे काय परिणाम होतील हे दिसतील, असेही म्हणत सूचक इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.

Published on: May 19, 2023 01:43 PM