शिवसेना अपात्रता प्रकरणावरील निकाल ऐतिहासिक असणार? अनिल देसाई सुनावणीवर म्हणाले....

शिवसेना अपात्रता प्रकरणावरील निकाल ऐतिहासिक असणार? अनिल देसाई सुनावणीवर म्हणाले….

| Updated on: Dec 20, 2023 | 4:34 PM

शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी भाष्य केले आहे. आज दोन्ही बाजूंनी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईल. तर शिवनसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील हा निर्णय ऐतिहासिक असेल आणि लोकशाहीसाठी देखील तो निर्णय महत्त्वाचा असेल, असा विश्वास अनिल देसाई यांनी व्यक्त केला.

नागपूर, २० डिसेंबर २०२३ : शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी भाष्य केले आहे. आज दोन्ही बाजूंनी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईल. त्यानंतर रिजॉइंडर अध्यक्षांच्या सूचनेनुसार सादर केले जातील, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली तर सत्याचा विजय होईल अशी अपेक्षा आहे. कारण ज्या प्रकारे राज्यात पहिल्यांदा अशाप्रकारे हे सगळं घडलं हे पाहता राज्यकर्त्याचे हे काम आहे की, योग्य न्याय मिळवून देणे आणि अध्यक्ष तशाप्रकारे न्याय मिळवून देण्याचं काम करतील, असे म्हणत अनिल देसाई यांनी आशा व्यक्त केली. दरम्यान, शिवनसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील हा निर्णय ऐतिहासिक असेल आणि लोकशाहीसाठी देखील तो निर्णय महत्त्वाचा असेल, असा विश्वास अनिल देसाई यांनी व्यक्त केला.

Published on: Dec 20, 2023 04:34 PM