मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण?

मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण?

| Updated on: Jul 01, 2024 | 5:18 PM

Mumbai Graduate Constituency election 2024 : मुंबई पदवीधर मतदार संघात ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत आहे अशातच मुंबई पदवीधर निवडणुकीत ठाकरे गटाकडून अनिल परब हे आघाडीवर आहेत तर भाजपचे किरण शेलार हे पिछाडीवर आहेत.

मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात ठाकरे गट आघाडीवर आहे. मुंबई पदवीधर निवडणुकीत ठाकरे गटाकडून अनिल परब हे आघाडीवर आहेत तर भाजपचे किरण शेलार हे पिछाडीवर आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर ६१ मतांनी आघाडीवर आहेत. तर चार पैकी दोन फेऱ्यांमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब हे जाहीर मतांचा कोटा गाठण्याच्या दिशेने आहेत. ५ हजार ८०० मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई पदवीधर मतदार संघात ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत आहे तर कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश किर यांच्यात चुरशीची लढत आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ज.मो. अभ्यंकर हे निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचा फैसला लवकरच समोर येणार असल्याने उत्सुकता कायम आहे.

Published on: Jul 01, 2024 05:18 PM