साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी अपडेट, दीड वर्षे नाहक बदनामी; अनिल परब यांचा सोमय्या यांच्यावर निशाणा
VIDEO | किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल, अनिल परब यांचा इशारा काय?
मुंबई : साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी हायकोर्टात खटला दाखल केल्याचे म्हणत किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, साई रिसॅार्टशी माझा संबंध नसल्याचं मी वारंवार सांगत होतो. माझ्यावर खोटे आरोप केले गेले. रिसॅार्टचं सांडपाणी समुद्रात जातं म्हणून ईडीने चौकशी केली. दीड वर्षे नाहक बदनामी केली गेली. तर अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली आहे. प्रकरण अंगलट येतंय म्हणून ते मागे घेतले गेले. एनजीटीने या प्रकरणात तथ्य नसल्याचं सांगितलं. रिसॅार्ट सुरू नसताना सांडपाणी समुद्रात जाईल कसं?असा रिपोर्ट सर्व तपास यंत्रणांनी दिला आहे. सत्र न्यायालयाने हा गुन्हा रद्द केलाय. ते रद्द केले जावेत म्हणून कोर्टात गेल्याचे परब म्हणाले. किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल किंवा 100 कोटीचा दावा द्यावा लागेल. हायकोर्टात मुद्दा होता तर एनजीटीत याचिका दाखल कशाला करायची? सगळीकडे खोट्या याचिका दाखल केल्या आहेत. राजकीय हेतूने प्रेरीत आरोप केल्याचे ते म्हटले.