यंदाच्या धुळवडीबाबत अनिल परब म्हणतात, ‘राजकीय धुळवड सतत चालूच असते पण…’
VIDEO | महाराष्ट्रातील जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा देत अनिल परब यांनी राजकीय प्रश्नावर काय दिली उत्तर... बघा व्हिडीओ
मुंबई : आज धुलिवंदनाचा सण आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईतही होळी आणि धुलिवंदनचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच राजकीय वर्तुळात देखील होळी उत्साहात साजरी केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी देखील होळीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेला होळीच्या व धुलीवंदनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. राजकीय धुळवड सतत चालूच असते परंतु आजचा हा जो दिवस आहे हा पवित्र दिवस आहे. कालच्या होळीमध्ये अविचार आपण सगळे जाळून टाकले आणि सुविचाराने नवीन कामाला सुरुवात करावी असे ते होळीचे तेज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात यावं अशी प्रार्थना करतो. त्याचबरोबर रंगाची उधळण करणार आहात विविध रंग उधळत अतिशय मनापूर्वक आनंदाने आणि सगळ्यांनी दिलखुलासपणे होळी खेळावी. मला असं वाटतं की महाराष्ट्रातील मला असं वाटतं की महाराष्ट्रातील जनतेने आजही सुखाचे क्षण अतिशय आनंदाने उपभोगावेत. दरम्यान यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर अनिल परब यांनी कोणतेही भाष्य केले नसून प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.