'म्हणून मी सुषमा अंधारे यांना दोन फटके मारले', ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव स्पष्टच म्हणाले...

‘म्हणून मी सुषमा अंधारे यांना दोन फटके मारले’, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव स्पष्टच म्हणाले…

| Updated on: May 19, 2023 | 8:36 AM

VIDEO | सुषमा अंधारे यांची पक्षात दमदाटी, त्यांच्याकडून सतत पैशांची मागणी? ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी काय केला दावा?

बीड : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नेतृत्वातील महाप्रबोधन यात्रा सध्या बीडमध्ये पोहोचली आहे. या दरम्यान ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा केला आहे. पण हा दावा सुषमा अंधारे यांनी फेटाळून लावला आहे. मला कुठलीही मारहाण झाली नसल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. तर एखादा जिल्हाप्रमुखाने महिलेवर हात उचलला, असं जाहीरपणे म्हणतो. त्याला आपल्यावर पोलीस केस होईल याची भीती वाटत नाही. याचा अर्थ या जिल्हा प्रमुखाला शिंदे गट आणि गृह मंत्रालयाकडून अभय आहे. त्यातूनच तो तसा बोलतोय. असे म्हणत महाप्रबोधन यात्रा दणक्यात होणार असल्याचा विश्वासही सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी पक्षात दमदाटी सुरू केली आहे. त्या सतत पैसे देखील मागत आहेत, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ते पद विकण्याचे काम करत आहेत म्हणून मी सुषमा अंधारे यांना दोन फटके मारले आहे असा दावा आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे.

Published on: May 19, 2023 08:36 AM