निवडणूक आयोग दळभद्री, ठाकरे गटाच्या नेत्यानं इलेक्शन कमिशनवर केली सडकून टीका; बघा व्हिडीओ
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्यासह निवडणूक आयोगावरही ठाकरे गटाच्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल
ठाणे : आज ठाण्यात शिवगर्जना कार्यक्रम झाला, त्यावेळी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार तोफ डागली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाला दळभद्री म्हणत त्यांनी इलेक्शन कमिशनला सवाल उपस्थित केले आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून तुम्ही 40 आमदारांचे मत विचारात घेता मग ज्या 140 जागांवर आम्ही निवडणूक लढवली ती मतं कुणाची आहेत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आज जरी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला असला तरी, तो निर्णय आम्हाला मान्य नाही. जो निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे, त्या कार्यक्रमाची स्क्रीप्ट ही भाजपच्या कार्यालयात लिहिली गेली आहे असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
Published on: Feb 26, 2023 07:40 PM
Latest Videos