तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे तुम्ही… अरविंद सावंत यांचा रोख नेमका कोणावर?
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी वडाळ्यातील विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली. विठूरायासमोर नतमस्तक होताना स्वार्थ असू नये, आमचे लोक जेव्हा तिथे जातात आणि रंग बदलतात, स्वार्थ भावनेने विठू रायाकडे नतमस्तक होतात तेव्हा वाईट वाटतं, असं म्हणत अरविंद सावंत यांनी विरोधकांना खोचक टोला लागावला
पांडूरंगाचं दर्शन शब्दात व्यक्त करता येत नाही, देवासमोर नतमस्तक होताना भाव वेगळेच असतात… वारकरी संप्रदायाच्या खांद्यावर भगवा आमच्या खांद्यावरी भगवा, असं ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी वडाळ्यातील विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली. विठूरायासमोर नतमस्तक होताना स्वार्थ असू नये, आमचे लोक जेव्हा तिथे जातात आणि रंग बदलतात, स्वार्थ भावनेने विठू रायाकडे नतमस्तक होतात तेव्हा वाईट वाटतं, असं म्हणत अरविंद सावंत यांनी विरोधकांना खोचक टोला लागावला. पुढे ते असेही म्हणाले, रोजगाराबाबत राज्य सरकार लाचार आहेत, सरकारची हिम्मत होत नाही केंद्राला विचारायची, हे सरकार वांजूटं आहे का? असा सवाल सावंतांनी केलाय. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण यासारख्या योजना आणल्या जात आहेत, पांडुरंगाची भक्ती निस्वार्थी माणसाने करावी… तूम्ही वारकरी नाही तुम्ही पाठीत वार करणारे आहेत, स्वार्थी आहात… देव तुम्हाला पाहून घेईल, असा हल्लाबोल सावंतांनी सरकारवर केला.