‘अरविंद सावंत यांची मस्ती आणि गुर्मी आम्ही उतरवणार’, कुणी दिला इशारा?
VIDEO | अरविंद सावंत यांनी रिक्षावाल्यांबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्याचा शिवसेनेच्या नेत्याकडून समाचार
ठाणे : ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी रिक्षावाल्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले अरविंद सावंत यांना खास करून धन्यवाद देईल.करणं आम्ही जे म्हणत होतो उद्धव ठाकरे सरकार राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कलेने चालतय. राष्ट्रवादी सांगेल त्या पद्धतीने चालतंय यायला पुष्टी आज अरविंद सावंत यांच्या वक्तव्यांनी मिळाली आहे. आम्ही बाहेर पडताना याचं कारणास्तव बाहेर पडलो, उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे हातचे बाऊल झालेले आहे आणि शिवसेना पूर्ण रसातळाला पोचवण्याचं काम या सरकारकडून होतंय आणि काँग्रेस राष्ट्रवादी मोठी होतेय. आमच्या आमदारांचा तेच म्हणणं होतं की राष्ट्रवादीच्या विचारसरणीने आणि राष्ट्रवादीचे मंत्र्यांडकरतात आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि आमदारांकरिता हे सरकार चालत आहे. त्याला पुष्टी आज अरविंद सावंत यांनी दिलेली आहे. आम्ही मुख्यमंत्री करताना शरद पवार यांना वाईट वाटेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या हाताखाली आपला माणूस आपला नेता कसं काम करेल हे अशी चिंता उद्धव ठाकरे यांना होते, असे म्हणत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी हल्लाबोल केला आहे.