विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या एकाची विकेट जाणार हे नक्की, ठाकरे गटाचा दावा
विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना भाजपच्या एका उमेदवाराची विकेट जाणार हे नक्की, असे म्हणत भास्कर जाधव यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. तर जयंत पाटील यांच्याबद्दल शिंदे गट काय बोलतो याच्याबद्दल शिंदे गट काय बोलतो याच्याशी देणंघेण नाही, असे जाधव म्हणाले.
जयंत पाटील यांच्याबद्दल शिंदे गट काय बोलतो याच्याबद्दल शिंदे गट काय बोलतो याच्याशी देणंघेण नाही, असे वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. तर विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना भाजपच्या एका उमेदवाराची विकेट जाणार हे नक्की, असे म्हणत भास्कर जाधव यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वीच सर्वच राजकीय पक्षांनी हॉटेल पॉलिटिक्स करत असल्याच पाहायला मिळत आहे. यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, ‘ज्या आमदारांच्या मतांमुळे आपण निवडून जाणार आहोत. त्यांचा मानसन्मान करणं, त्यांना एकत्र ठेवून त्यांच्यासोबत चर्चा करणं हेच महत्त्व आहे.’ तर ज्याच्या सोबत युती करतात त्याचाच घात भाजप करतो, हा भाजपचा इतिहास असल्याचे म्हणत भास्कर जाधव यांनी खोचक टोला लगावला आहे.
Published on: Jul 11, 2024 04:46 PM
Latest Videos