शिंदे गटाच्या 4-5 खासदारांवर रडण्याची वेळ, उमेदवारीवरून ठाकरे गटातील बड्या नेत्याची टीका
उदय सिंह राजपूत यांनी आज चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, 'मी माझ्या आईला सोडणार नाही, बाळासाहेबांना सोडणार नाही.. असं वक्तव्य उदय सिंह राजपूत यांनी केलं होतं. यांच्यामुळे कळालं 50 खोके कसे आहेत, उध्दव ठाकरे यांच्यापासून सगळ्यांना उदय सिंह राजपूत यांचा अभिमान आहे.
शिंदे गटाच्या चार ते पाच खासदारांवर रडण्याची वेळ येतेय, असं ठाकरे गटातील बड्या नेत्यानं वक्तव्य करत शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. शिंदे गटातील खासदारांच्या उमेदवारीवरून ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हा हल्लाबोल केलाय. उदय सिंह राजपूत यांनी आज चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, ‘मी माझ्या आईला सोडणार नाही, बाळासाहेबांना सोडणार नाही.. असं वक्तव्य उदय सिंह राजपूत यांनी केलं होतं. यांच्यामुळे कळालं 50 खोके कसे आहेत, उध्दव ठाकरे यांच्यापासून सगळ्यांना उदय सिंह राजपूत यांचा अभिमान आहे. आज एकनिष्ठ लोकांची गरज आहे’, असं म्हणत खैरे म्हणाले. काय झालं या लोकांचं 13 खासदार फुटले 4-5 खासदार रडत आहेत, पण आता त्यांना कळलं असेल आणि उध्दव ठाकरेंनी सांगितलं होतंच की कुणालाही सोबत घेऊन नये, असे म्हणत शिंदे गटात गेलेल्या आमदारांना खैरेंनी सुनावलं आहे.