गद्दारी करणाऱ्यांचे अधःपतन होणार, चंद्रकांत खैरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल
VIDEO | ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा शिंदे गटावर निशाणा, म्हणाले, जनतेमध्ये शिंदे गटाला झिरो मत आणि...
औरंगाबाद : गद्दारी करणाऱ्यांचे अधःपतन होणार तर जनतेमध्ये शिंदे गटाला झिरो मत आहे, तरी शिंदे गट मस्तीत वावरतात, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. तर उद्धव ठाकरे हे प्रामाणिक नेते आहे. त्यामुळे त्यांचा विजय नक्कीच होणार असल्याचा विश्वासही चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली त्यांचे प्रत्यक्ष काय हाल झाली पाहताय..बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकांसाठी शिवसेना तयार केली आणि ती मोठी केली मात्र त्यांच्या शिवसेनेतूनक कोणी गद्दारी केली तर त्याचं अधःपतन होत असते आणि त्यांना जगदंबेचा कोप असतो. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील लोकांना किती मोठं केलं तरी त्यांनी शिवसेनेत फूट पाडली असे असतानाही त्यांचं जनतेत ते काहीच नाही त्यांचं झिरो मत असल्याची खोचक टीकाही चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर केली आहे.