Karnataka Election Results 2023 : 'बाळासाहेबांच्या शापामुळे भाजपचा पराभव', ठाकरे गटाच्या नेत्याचा निशाणा

Karnataka Election Results 2023 : ‘बाळासाहेबांच्या शापामुळे भाजपचा पराभव’, ठाकरे गटाच्या नेत्याचा निशाणा

| Updated on: May 13, 2023 | 3:20 PM

VIDEO | कर्नाटकात हनुमानाची गदा भाजपच्या डोक्यावर पडली, ठाकरे गटाच्या नेत्याचा खोचक टोला

छत्रपती संभाजीनगर : कर्नाटक विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आणि आज या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. मात्र या निकालात काँग्रेस आघाडीवर दिसत असून भाजप पिछाडीवर आहे. भाजपला कर्नाटकात फारसा प्रतिसाद न मिळाल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘१३० जागेच्या पुढे काँग्रेस जातेय तर ६५ जागांवर भाजप आहे. या निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजपचे बडे नेते प्रचार करण्यासाठी कर्नाटकात प्रचारासाठी गेले होते. मात्र जनतेने भाजपला साथ दिली नाही, यासाठी कर्नाटकच्या जनतेचे कौतुक करायला हवे. त्यामुळे दक्षिणेतून भाजप हद्दपार झाली आहे’, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. पंजाब, दिल्ली, पं, बंगाल, बिहार हातून गेलं आहे. शिवसेनेला सोडल्यानंतर भाजपची ही परिस्थिती झाली आहे. शिवसेना प्रमुखांना ज्यांनी धोका दिला त्यांचे हाल बेकार होतात, असे म्हणत बाळासाहेबांच्या शापामुळे भाजपचा पराभव झाल्याचे चंद्रकांत खैरे यांनी म्हणत भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला.

Published on: May 13, 2023 03:20 PM