नारायण राणे यांना पुन्हा खासदारकी नाही?; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा दावा काय?

नारायण राणे यांना पुन्हा खासदारकी नाही?; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा दावा काय?

| Updated on: Jan 31, 2024 | 1:55 PM

गेल्या दोन दिवसांपूर्वी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून नारायण राणे यांनी राज्य सरकारला घेरल्याचे पाहायला मिळाले होते. आरक्षण हा नाजूक प्रश्न आहे असे म्हणत नारायण राणे यांनी सरकारला सूचक इशारा दिला तर आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच ठाकरे गटाच्या नेत्यानं नारायण राणेंवर केला हल्लाबोल

बुलढाणा, ३१ जानेवारी २०२४ : मराठा आणि कुणबी या दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत. मात्र त्यांनी त्यांच्या समिती अहवालात मराठा आणि कुणबी या दोन्ही जाती एकत्र असल्याचा दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून नारायण राणे यांनी राज्य सरकारला घेरल्याचे पाहायला मिळाले होते. आरक्षण हा नाजूक प्रश्न आहे. त्याचा सरकारने सखोल विचार करावा. कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्त्वाचे आहेत एवढंच मला सांगावेसे वाटते, असा सूचक इशाराही त्यांनी दिला होता. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठं भाष्य केले आहे. ‘नारायण राणे हे सर्व राज्यसभेचं तिकीट मिळावं म्हणून करताय.’ असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय. तर नारायण राणे यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपत येत असल्याने त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली यावर भाष्य करताना चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केलाय. बघा काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

Published on: Jan 31, 2024 01:55 PM