मुख्यमंत्र्यांबद्दलचं ‘ते’ वक्तव्य अंगाशी, ठाकरे गटाचे नेते अन् माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक
मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याने दत्ता दळवी यांना त्यांच्याविक्रोळीतील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. दत्ता दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर ठाकरे गटाला चांगलाच झटका बसला आहे.
मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरणं ठाकरे गटाचे नेते अन् माजी महापौर यांना चांगलंच महागात पडलं आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याने दत्ता दळवी यांना त्यांच्याविक्रोळीतील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. दत्ता दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर ठाकरे गटाला चांगलाच झटका बसला आहे. आज सकाळी ८ वाजता पोलिसांनी दत्ता दळवी यांना अटक केली असून भांडूप येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रविवारी भांडूपध्ये ठाकरे गटाने कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला होता. यामध्ये दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते. राजस्थानमधील प्रचारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे ‘हिंदुह्रदयसम्राट’ अशी उपमा लावण्यात आली होती. त्यामुळे दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली होती. हिंदुहृदयसम्राट वापरत आहेत. अरे XXXच्या तुला हिंदुहृदयसम्राटाचा अर्थ तरी माहिती आहे का? असा सवाल केला आहे.