पोळ यांना मारहाणीवरून ठाकरे गट आक्रमक, केदार दिघे यांचा इशारा यांचा थेट इशारा; म्हणाले, ‘तर बघू…’
अयोध्या पोळ यांनी कळवा पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही तर आम्ही काय करायचं ते बघू असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.
ठाणे : ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर कळवा येथे शुक्रवारी संध्याकाळी हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. त्यांना मारहाण देखील करण्यात आली आहे. त्यानंतर अयोध्या पोळ यांनी कळवा पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही तर आम्ही काय करायचं ते बघू असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी, अयोध्या पोळ यांच्यावर झालेली शाई फेक व मारहाण दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं आहे. तर हे षडयंत्र असून त्यांना मारहान करण्यासाठीच हा बनाव करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर याप्रकणी पोळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस चौकशी करतीलच. पण जर त्यांनी त्यावर कारवाई केली नाही तर बघू आम्हाला काय करायचं ते असा इशारा त्यांनी दिला आहे.
Published on: Jun 17, 2023 10:10 AM
Latest Videos