फडणवीस यांच्या ‘आम्हाला सगळं कळतं’च्या टीकेली राऊत यांचा टोला म्हणाले, ‘पण आम्हाला खोक्यांच…’
त्यांनी आमचे पूर्वीचे मुख्यमंत्री म्हणायचे की त्यांना राजकारण, अर्थसंकल्प, सहकार क्षेत्र आणि इतर अनेक गोष्टी कळत नाहीत. म्हणूनच शरद पवार यांनी पुस्तकात ठाकरे यांना राजकारणही कळत नाही असं म्हटलं.
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नाशिकमध्ये अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी आमचे पूर्वीचे मुख्यमंत्री म्हणायचे की त्यांना राजकारण, अर्थसंकल्प, सहकार क्षेत्र आणि इतर अनेक गोष्टी कळत नाहीत. म्हणूनच शरद पवार यांनी पुस्तकात ठाकरे यांना राजकारणही कळत नाही असं म्हटलं. मात्र अर्थसंकल्प, राजकारण आणि अर्थशास्त्र या सर्व गोष्टी आम्हाला समजतात. यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीस, यांनी टोला लगावला आहे. यावेळी राऊत यांनी फडणवीस यांना, तुम्ही सांगा तुम्हा जास्त कळतं, ज्या प्रकारे तुम्ही राज्यात खोके वालं सरकार स्थापन केलं ते नॉलेज आम्हाला नाही. भ्रष्टाचार करणं, भ्रष्टाचार करणाऱ्यांना सहकार्य करणे, ईडी आणि सीबीआयच्या मदतीने सरकरं पाडणे याचा अभ्यास आम्हाला नाही असेही राऊत यांनी म्हटलं आहे.