‘मणिपूरमध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं, शाह गृहमंत्री...’; राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

‘मणिपूरमध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं, शाह गृहमंत्री…’; राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

| Updated on: Jun 24, 2023 | 2:55 PM

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी शाह यांच्यावर टीका करताना, मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार सरकार थांबवू शकलेले नाही, हे या सरकारचा अपयश असल्याचं म्हटलं आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. येथे तोडगा निगालेला नाही. त्यामुळे अजूनही मणिपूर धूमसत आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी शाह यांच्यावर टीका करताना, मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार सरकार थांबवू शकलेले नाही, हे या सरकारचा अपयश असल्याचं म्हटलं आहे. तर शाह हे गृहमंत्री असूनही लोहपुरुष असूनही मणिपूरचा हिंसाचार ते थांबवू शकले नाहीत. हे या सरकारचं अपयश असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे. तर गेल्या दोन महिन्यांपासून तेथे हिंसाचार उसळला आहे. मात्र आता बैठका घेतल्या जात आहेत. या बैठका आधीच व्हायला हव्या होत्या. तर असं करणं हाच या सरकारचा डाव आहे. या सरकारमध्ये हिंमत नाही. खरं तर ही बैठक पंतप्रधान मोदी यांनी घ्यायला हवी होती. मात्र ते असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Published on: Jun 24, 2023 02:55 PM