राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची खोचक टीका
दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात दादर हा भाग येतो. याच मतदारसंघात राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला आहे. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त दिलेल्या पाठिंब्यावर संजय राऊत यांनी ही सडकून टीका केली आहे. तर संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरे यांचं नाव असणार नाही कारण...
राज ठाकरे चोरलेल्या धनुष्यबाणाचं चुंबन घेत आहेत, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त दिलेल्या पाठिंब्यावर संजय राऊत यांनी ही सडकून टीका केली आहे. तर संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरे यांचं नाव असणार नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटले आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, ‘शिंदेचा धनुष्यबाण हा नकली आहे. तो बाळासाहेब ठाकरे यांचा नाही. चोरलेला आहे. चोरीच्या मालावर राज ठाकरे हक्क सांगताय. राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेत आहेत’, असे म्हणत सडकून टीका केली. दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात दादर हा भाग येतो. याच मतदारसंघात राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेतील राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यातर लोकसभेची चुरस पाहायला मिळत आहे.