Sanjay Raut on Devendra Fadnavis : ‘मी पुन्हा येईन म्हणणारे आता…’, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला
Sanjay Raut on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत. महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही’, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर लोकसभेच्या निकालातील पराभवावरून हल्लाबोल केला आहे. ‘मी पुन्हा येईन…पुन्हा येईन.. लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन, असे गळा फ़ोडून सांगणारे आता, मला जाऊदे ना घरी वाजले की बारा अशी रेकॉर्ड लावत आहेत. छान… महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत’, असं ट्विट करत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या भूमिकेवरून टीकास्त्र डागलं आहे.
Published on: Jun 06, 2024 03:04 PM
Latest Videos