मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री अमित शाह या दोघांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, हे गद्दार आणि बेईमान आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांची भूमिका अशी होती. पण त्याच मोदी - शाहांच्या मांडीला मांडी लावून बसणार, ठाकरे गटाचे नेते खासदार राज ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर पडली असले म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. तर दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरेंना नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे गद्दार वाटायचे पण आता राज ठाकरे हे मोदी – शाहांच्या मांडीला मांडी लावून बसणार असल्याचे वक्तव्य ही संजय राऊत यांनी केले आणि राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री अमित शाह या दोघांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, हे गद्दार आणि बेईमान आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांची भूमिका अशी होती. पण त्याच मोदी – शाहांच्या मांडीला मांडी लावून बसताना संपूर्ण महाराष्ट्र पाहिल, असे संजय राऊत राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले.
Published on: May 12, 2024 05:53 PM
Latest Videos