Sanjay Raut :  'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआ फुटली? पडली वादाची ठिणगी? संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut : ‘तर आम्ही आमचा मार्ग…’; मविआ फुटली? पडली वादाची ठिणगी? संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jan 10, 2025 | 11:49 AM

आज माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी काही गंभीर आरोप केले. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात जो विलंब लागला, त्यामागे काही कारस्थान आहे का? असा संशय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. आज माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी काही गंभीर आरोप केले. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीने लांबली गेली त्याची गरज नव्हती. ती का? कोणामुळे कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवार यांना माहिती असावी. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य आहे. कोणत्याही आघाडीत जागा वाटप इतक्या विलंबाने झालं तर अस्वस्थतता पसरते. कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही. या उलट महायुतीत दोन महिन्यांपूर्वीच जागा वाटप झालं होतं. बाकी त्यांच्या चर्चा सुरू असतील’, असं संजय राऊत म्हणाले. पुढे त्यांनी असेही म्हटले की, विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे. ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. चुका झाल्या. त्या स्वीकारल्या पाहिजेत. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सीट शेअरिंग झालं. आता आम्हाला कळतंय. तेव्हा आम्ही सांगत होतो. पण त्यावर आता चर्चा करण्यात अर्थ नसल्याचेही संजय राऊत म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रासारखं राज्य महाविकास आघाडीच्या हातून जाणं ही या राज्यासाठी दुर्घटना आहे” असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात विधानसभा निकालानंतर तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही. हे सत्य आहे. तो जर नाही राहिला तर भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेल आणि आम्ही आमचा मार्ग निवडू…, असेही संजय राऊत म्हणाले.

Published on: Jan 10, 2025 11:41 AM