अन् भाजपची झोप उडाली, संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल; बघा काय केली टीका

अन् भाजपची झोप उडाली, संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल; बघा काय केली टीका

| Updated on: Mar 03, 2023 | 12:27 PM

VIDEO | ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालावरून भाजपला डिवचले... बघा काय म्हणाले

कोल्हापूर : कालच कसब्यातील पोटनिवडणुकीचा निकाल लागला. या निकालावर अद्याप राजकीय वर्तुळातून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालावरून भाजपला डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. कसब्याचा निकाल आल्यापासून त्यांना घाम फुटला आहे. त्यांची थोडीफार झोप शिल्लक होती तीही उडाली आहे. कसब्यात पराभव झाला. पण चिंचवडमध्येही त्यांचा विजय झाला मानायला हे तयार नाहीत. मागच्यावेळी कसब्यात राष्ट्रवादीला 44 हजार मते मिळाली होती. आता लाखावर मते मिळाली. आमच्यातील बंडखोर उभा केल्याने त्यांना यश मिळालं, असं संजय राऊत यांनी सांगितलं. ते कोल्हापुरात मीडियासी संवाद साधत होते. शिवसेना जास्त जागा जिंकेल असं वातावरण मी कोल्हापुरात पाहिलं. आम्ही विरोधाककडे पाहतच नाही. विरोधक नाहीच आहे. काही लोक रस्त्यावर उड्या मारत असतात आमच्या विरोधात. काही वर्षाने तेही नष्ट होतील, असा टोला त्यांनी लगावला.

Published on: Mar 03, 2023 12:04 PM