EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल

EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून… संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल

| Updated on: May 21, 2024 | 1:54 PM

मतदान प्रक्रिया संथ झाल्याने जनतेला मतदानासाठी रांगेत कित्येकवेळ उभे राहावे लागले. लोक कंटाळून निघून जातील, त्यांना मतदान करता येणार नाही, अशा प्रकारची यंत्रणा सोमवारी राबविण्यात आल्याची शंका संजय राऊतांनी व्यक्त केली

मुंबईतील मतदान प्रक्रिया संथ गतीने झाल्याचे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह भाजपवर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, मतदान प्रक्रिया संथ झाल्याने जनतेला मतदानासाठी रांगेत कित्येकवेळ उभे राहावे लागले. लोक कंटाळून निघून जातील, त्यांना मतदान करता येणार नाही, अशा प्रकारची यंत्रणा सोमवारी राबविण्यात आल्याची शंका संजय राऊतांनी व्यक्त केली. इतकंच नाहीतर राऊत असेही म्हणाले, ‘मला कोणताही जातीय किंवा प्रांतीय वाद करायचा नाही. पण जिथे शिवसेनाला किंवा महाविकास आघाडीला भरघोस मतदान होऊ शकेल, त्याच ठिकाणी कासवगतीने यंत्रणा चालवली’, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तर भाजपसह मित्रपक्षांना मते मिळतील, अशा ठिकाणी मतदान यंत्रणा सुरळीत होती. पण महाविकास आघाडीला जादा मतदान मिळत असलेल्या ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडविण्यात आल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला. तर आम्ही जागरुक असल्यानेच त्यांना ईव्हीएम हॅक करता आले नाही, पैसे वाटप आम्ही पकडले तरी त्यांनी पैसे वाटले, असे म्हणत संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Published on: May 21, 2024 01:54 PM