Saamana Editorial Video : ‘ईव्हीएमलाही शाही स्नानानं पापमुक्त….’, संजय राऊतांचा ‘सामना’तून भाजपला खोचक टोला
'गंगास्नानाने श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत काय? घोटाळे करून निवडून येणारे व सत्ता राबविणारे कुंभ काळात गंगास्नान करतात. महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने या काळात एक करावे, भाजप पुरस्कृत ईव्हीएमला वाजत गाजत प्रयागतीर्थी संगमावर न्यावे'
ईव्हीएमलाही शाही स्नान घडवून पापमुक्त करावं, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे तर घोटाळा करून निवडून येणारे कुंभमेळात गंगास्नान करतात, असं म्हणज संजय राऊत यांनी सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधत सडकून टीका केली आहे. ‘गंगास्नानाने श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत काय? घोटाळे करून निवडून येणारे व सत्ता राबविणारे कुंभ काळात गंगास्नान करतात. महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने या काळात एक करावे, भाजप पुरस्कृत ईव्हीएमला वाजत गाजत प्रयागतीर्थी संगमावर न्यावे’, असं खोचकपणे राऊतांनी या अग्रलेखात म्हटलंय. तर कुंभ सोहळ्यात महत्त्वाच्या राजकीय व्यक्ती, गौतम अदानींसारखे श्रीमंत शेठ यांच्या कुंभस्नानासाठी प्रशासन चार-चार दिवस राबत असते. कोणताही ओरखडा न उठता त्यांचे गंगास्नान होते व मोक्षाचे दरवाजेही उघडतात, पण स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडणाऱ्या श्रद्धाळूंना गर्दीत चेंगरून मरावे लागते. प्रयागतीर्थी कुंभमेळ्यात शंभर भाविकांचा मृत्यू झाला तसा देशातील लोकशाहीचाही प्रयागतीर्थी मृत्यू झाला आणि मृत्यूस कारण ठरलेले अमृतस्नान करून दिल्लीस पोहोचले. जनता मात्र तुडवून तुडवून मारली जात आहे. त्यामुळे मोक्ष कुणाला मिळाला? असा सवालच सामनातून करण्यात आलाय. बघा नेमकं काय म्हटलंय?

पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’

'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी

संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध
