'नितेश राणे तुम्ही शेपूट घालून भाजपात गेलात', कुणी केला हल्लाबोल?

‘नितेश राणे तुम्ही शेपूट घालून भाजपात गेलात’, कुणी केला हल्लाबोल?

| Updated on: May 29, 2023 | 3:07 PM

VIDEO | देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्यावर लक्ष ठेवावं, राणे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, कुणी केला दावा?

सोलापूर : ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांची भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधल्याचे समोर आले आहे. भाजपने आदेश दिला तर नितेश राणे तू, तुझा भाऊ आणि बाप आपले राणे आडनाव देखील भाजपत विलीन कराल. नितश राणेला दिवसाढवळ्या स्वप्न पडायला लागलंय. तुझ्या पक्षाची तू विल्हेवाट लावली आहे आणि दुसऱ्या पक्षाचे तू वाकून बघायला लागला. तर तुझा बाप आणि भाऊ पराभूत झाल्यावर शेपूट घालून तुम्ही भाजपत गेला असे म्हणत शरद कोळी यांनी खालच्या भाषेत टीका केली. शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे स्वाभिमानी आहेत तुमच्यासारखे गद्दार नाहीत. शिंदे आणि भाजपने पक्ष जरी चोरला असला तरी स्वाभिमानाने लढून पक्ष आणि चिन्ह परत आणणार, असा विश्वासही शरद कोळी यांनी व्यक्त करत राणे कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केलाय. तर नेतेश राणेला आता कळून चुकलंय की, आता भाजपची राज्यातून सत्ता जाणारे. त्यामुळं हे राणे कंपनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. फडणवीस साहेब यांच्यावर लक्ष ठेवा. कारण नितेश राणे आणि नारायण राणेला नवरे बदलण्याची सवय आहे, असे म्हणत सडकून टीका केली.

Published on: May 29, 2023 03:01 PM