नादाला लागायचं नाही, शिवसैनिकाचा अंत झालाय; मनसे नेते संदीप देशपांडे यांना कुणी दिला इशारा?
VIDEO | राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे आहे म्हणून आम्ही मान राखतो नाहीतर..., संदीप देशपांडे यांना इशारा; बघा व्हिडीओ कुणी साधला निशाणा
सोलापूर : संजय राऊत यांच्या कानाखाली मारण्याचं सोडा तुम्ही फक्त आमच्या समोर तर येऊन, बघा मग कोण कोणाला कानाखाली मारते ते कळेल, असा इशारा देत ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी जर यापुढे ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीका केली तर आम्ही राज ठाकरे यांच्यावर टीका करणार. राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे आहे म्हणून आम्ही मान राखतो नाहीतर त्यांना पण मान आम्ही ठेवणार नाही. तर आमदारकी मिळण्यासाठी मनसे पक्ष हा अमित शाह यांचे पाय चाटतोय, अशी टीकाही शरद कोळी यांनी केली. एक आमदार निवडून आणण्याची औकात नसलेला मनसे पक्ष सत्तेत सामील होण्यासाठी अमित शहांच्या पुढे पुढे करतोय. दम असेल तर आमच्या समोर येऊन बोला मग कोण कोणाला कानाखाली वाजवतंय ते बघू असे म्हणत शरद कोळी यांनी संदीप देशपांडे यांना खुले आव्हान दिले आहे.