'नितेश राणे म्हणजे अक्कल नसलेला माणूस अन् राज्याला कलंक', कुणाची घसरली जीभ?

‘नितेश राणे म्हणजे अक्कल नसलेला माणूस अन् राज्याला कलंक’, कुणाची घसरली जीभ?

| Updated on: Jun 12, 2023 | 11:22 AM

VIDEO | 'राणे कुटुंब राजकारणाला लागलेला अपशकून', कुणी केला नितेश राणे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर घणाघात?

सोलापूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे 10 जूनला राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी भविष्यवाणी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी केली होती. यावर प्रत्युत्तर देत ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय. ‘नितेश राणे तुझी भविष्यवाणी खोटी ठरली. तुझी भविष्यवाणी म्हणजे नेपाळमधून आलेल्या आणि घरोघरी फिरून खोटी भविष्यवाणी सांगणाऱ्याप्रमाणे आहे. मात्र नितेश राणे तुझी भविष्यवाणी खोटी ठरल्यामुळे बुडाला आग लागली का?’, असा सवाल करत शरद कोळी यांनी नितेश राणे यांच्यावर एकेरी शब्दात निशाणा साधला आहे. पुढे ते असेही म्हणाले, नितेश राणे म्हणजे दोन तोंडी मांडूळासारखा दोन्ही बाजूने बोलणारा आणि टिटवी सारखा अपशकुनी आहे. टिटवी टीव टीव ओरडल्यानंतर अपशकुन घडणार असे म्हणतात तसेच तू टीव्हीवर येऊन बोलल्यानंतर अपशकून होत आहे. राणे कुटुंब म्हणजे राजकारणाला लागलेला अपशकून आहे. 2024 ला भाजपवाले राणे कुटुंबाची अवकात त्यांना दाखवणार आहेत. नितेश राणे म्हणजे अक्कल नसलेला बेअब्रू आणि राज्याला लागलेला कलंक आहे, असाही घणाघात त्यांनी नितेश राणे यांच्यावर केला.

Published on: Jun 12, 2023 11:22 AM