'माजलेले बोकडं अन् नामर्दाची औलाद...', ठाकरे गटाच्या नेत्याचा राणेंवर हल्लाबोल; काय दिला इशारा?

‘माजलेले बोकडं अन् नामर्दाची औलाद…’, ठाकरे गटाच्या नेत्याचा राणेंवर हल्लाबोल; काय दिला इशारा?

| Updated on: Aug 29, 2024 | 12:55 PM

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मविआ नेत्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत इतकंच नाहीतर राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावर ठाकरे गटाच्या नेत्यानं प्रतिक्रिया देत राणेंवर टीकास्त्र डागलंय.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याचं राजकारण एका वेगळ्याच वळणावर पोहोचले आहे. शिवरायांचा पुतळा कोसळला त्या जागेची पाहणी कऱण्यासाठी काल बुधवारी आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकासाघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पोहोचल्याचे पाहायला मिळाले तर एकाचवेळी भाजप नेते निलेश राणे आणि नारायण राणे हे देखील तिथे उपस्थित होते. मात्र त्याचवेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेही दाखल झालेत. तर पोलिसांनी नारायण राणेंना मुख्य प्रवेशद्वाराबाहेर थांबवून ठेवल्याने नितेश राणे आणि भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. यावेळी भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत आणि त्यांच्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, ठाकरे आणि भाजप यांच्यात झालेल्या राड्यानंतर ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी शरद कोळी यांनी नारायण राणेंचा एकेरी उल्लेख करत नामर्द असल्याचे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published on: Aug 29, 2024 12:54 PM