मशालीने दाढी जाळून टाकू, ठाकरे गटाच्या या नेत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं
VIDEO | ठाकरे गटाच्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा, बघा काय केली टीका?
सिंधुदुर्ग : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे यांची शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या निर्णयाला थेट आव्हान देखील दिले. दरम्यान, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटात अजूनही शाब्दिक वार सुरू असल्याचे पाहायाला मिळत आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. धनुष्यबाण हे रामाच्या हातात शोभून दिसते, रावणाच्या नाही. तुम्ही धनुष्यबाण घेऊन आलात तर आम्ही तुम्हाला मशालीने पळवून लावू आणि ती दाढीपण जाळून टाकू, असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी कुडाळ येथे आयोजित शिवगर्जना मेळाव्यात केली.