Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sudhakar Badgujar : ... तर मी जाहीरपणे जीव संपवेल, 'त्या' प्रकरणावरून सुधाकर बडगुजर आक्रमक

Sudhakar Badgujar : … तर मी जाहीरपणे जीव संपवेल, ‘त्या’ प्रकरणावरून सुधाकर बडगुजर आक्रमक

| Updated on: Dec 18, 2023 | 2:51 PM

२०१६ च्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी हे मोठं वक्तव्य केले आहे. मी दिलेली कागदपत्र खोटी असतील तर जाहीर आत्महत्या करेन, २०१६ च्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी हे मोठं वक्तव्य केले आहे.

नाशिक, १८ डिसेंबर २०२३ : गेल्या दोन दिवसांपूर्वी १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या पार्टीत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. तर २०१६ च्या प्रकरणावरून सुधाकर बडगुजर यांनी हे मोठं वक्तव्य केले आहे. मी दिलेली कागदपत्र खोटी असतील तर जाहीर आत्महत्या करेन, २०१६ च्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी हे मोठं वक्तव्य केले आहे. तर २०१६ साली आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा सुधाकर बडगुजर यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरू आहे. इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण बघितले नाही. काँग्रेसचे आमदार कैलास गौरंट्याल यांनी सांगितले 1998 साली सलीम कुत्ता यांचा मृत्यू झाला आहे. दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नात काही राजकीय लोक गेले होते. पक्षाला बदनाम करण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन बोलू नका, हे चुकीचं असल्याचंही बडगुजर यांनी म्हटले. तर आक्रमक होत बडगुजर यांनी सलीम पार्टीच्या प्रकरणावरील आरोपांवर बोलताना आरोप खरे असतील तर जाहीरपणे गळफास घेईल असे म्हटले.

Published on: Dec 18, 2023 01:43 PM