Sushma Andhare : सुषमा अंधारे यांचा मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप, बघा काय म्हणाल्या?
VIDEO | ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला आहे. याप्रकरणी राज्यात एकच खळबळ उडाली. ससूनमध्ये आरोपी आणि वेगवेगळ्या गुन्हेगारांवर उपचार केले जातात, तेथून मोठा आरोपी फरार होतोच कसा? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
पुणे, १० ऑक्टोबर २०२३ | ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला आहे. ससूनमध्ये आरोपी आणि वेगवेगळ्या गुन्हेगारांवर उपचार केले जातात, तेथून मोठा आरोपी फरार होतोच कसा? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी करत मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिवसेना नेते दादा भुसे यांनी रुग्णालय प्रशासनाला फोन केला होता, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला असून दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा. खरी माहिती समोर येईल, असा दावा देखील सुषमा अंधारे यांनी केलाय. तर या सगळ्यात दादा भुसे यांच्या नावाच्या अवतीभोवती संशयाचं धूकं असेल तर त्यांचे कॉल रेकॉर्ड का चेक केलं जात नाही? दादा भुसे यांना प्रश्न का विचारले जाऊ नयेत? गृह खात्याची इच्छा शक्ती असेल तर हा विषय त्यांनी स्पष्ट करायला हवा, असे म्हणत त्यांनी आवाहन केलं आहे.