ड्रग्ज तस्कर ललीत पाटील प्रकरणात सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांच्यावर केले गंभीर आरोप, म्हणाल्या…
tv9 marathi Special Report | ड्रग्ज तस्कर प्रकरणातला आरोपी ललीत पाटीलवरुन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यानंतर मंत्री दादा भूसेंनी सुषमा अंधारेंना आरोप सिद्ध करण्याचं दिलं आव्हान
मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | ड्रग्ज तस्कर प्रकरणातला आरोपी ललीत पाटीलवरुन सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केला. शिंदे गटाचे मंत्री दादा भूसेंचे कॉल रेकॉर्ड तपासा अशी मागणी अंधारेंनी केलीय. त्यानंतर मंत्री दादा भूसेंनी सुषमा अंधारेंना आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलंय. सुषमा अंधारे, नाना पटोले आणि रविंद्र धंगेकर या तिघांनीही ससून रुग्णालयातून पळून गेलेला ड्रग्ज तस्करीतला आरोपी ललीत पाटील प्रकरणात गंभीर आरोप केलाय. सुषमा अंधारेंनी थेट मंत्री दादा भूसेंचं नाव घेतलंय. दादा भूसेंचे कॉल डिटेल्स चेक करा, अशी मागणी अंधारेंनी केलीय. तर चौकशी करुन दूध का दूध आणि पानी का पानी करा, चौकशीतून काही निघालं नाही तर सुषमा अंधारेंनी मालेगावच्या जनतेची माफी मागावी, असं भूसे म्हणालेत. जो आरोप अंधारेंनी केला तसाच आरोप धंगेकर आणि पटोलेंनीही केलाय. शिंदे गटाच्या एका मंत्र्यांचा ड्रग्ज प्रकरणात हात असल्याचं धंगेकर म्हणाले, तर पटोलेंनी काही आमदारांचा समावेश असल्याचं म्हटलंय. बघा कोणी काय केला आरोप?