‘तर मी सुद्धा गद्दारी केली असती’, सुषमा अंधारे यांनी नेमकं काय केलं वक्तव्य?
VIDEO | सदानंद कदम यांच्यावरील ईडी कारवाईमागे रामदास कदम, सुषमा अंधारे यांचा मोठा गोप्यस्फोट
पुणे : शिवसेना नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे. अशातच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्यावरील कारवाई मागे एक लाख एक टक्के रामदास कदम यांचाच हात असावा, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर केला आहे. यावेळी त्यांनी रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांच्यावरही निशाणा साधला. मला राजकारणाचा गंध नाही. मला राजकारण कळत नाही, असं आमदार योगेश कदम म्हणत आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मला राजकारणाचा गंध नाही. कारण योगेशच्या वडिलांनी 50 खोक्यांसाठी शिवसेनेशी गद्दारी केली. राजकारणाचा गंध नसल्याने मला तशी गद्दारी करता येत नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.