'लोढांनी फार लोड घेऊ नये', आक्रमक होत सुषमा अंधारे यांनी काय केला सवाल?

‘लोढांनी फार लोड घेऊ नये’, आक्रमक होत सुषमा अंधारे यांनी काय केला सवाल?

| Updated on: Apr 13, 2023 | 8:13 PM

VIDEO | विधवा महिलांना गंगा भागीरथी तर मग पुरूषांना ..., सुषमा अंधारे यांनी काय केला सवाल?

मुंबई : विधवा स्त्रियांना गंगा भागीरथी म्हटले पाहिजे, असे म्हणत विधवांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा नवा शब्द सुचवला. त्यांनी बुधवारी प्रधान सचिवांना या संदर्भात एक पत्र लिहिलं. यावर काही सामाजिक व महिला कार्यकर्त्यांनी टीका केली आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील मंगल प्रभात लोढा यांच्या या प्रस्तावावर जोरदार टीका केली आहे. ‘विधवा महिलांना गंगा भागीरथी म्हणण्यावरून सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, राज्यात ज्या खात्याला महिला मंत्री नाहीत, तिथं असं असंवेदनशील विधान येणारच.. गंगा भगीरथी महिलांना तर पुरुषांना म्हसोबाचा माळ लावणार का? असा फाजीलपणा लोढा यांनी करु नये… माझं तर म्हणणं आहे लोढा यांनी जास्त लोड घेऊ नये’, असे त्या म्हणाल्या. याऐवजी भाजप आणि शिंदे गटाकडून महिलांबद्दल प्रचंड असंवेदनशीलतेने विधानं येत आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गंभीर का नाहीत? त्यांच्याही घरात महिला आहेत. मग शिरसाट, कंबोज, लोढांनी केलेलं वक्तव्य ते गांभीर्याने का घेत नाहीत, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय.

Published on: Apr 13, 2023 08:08 PM