Sushma Andhare यांनी पुन्हा डिवचलं, डीजेवरुन मनसे अन् ठाकरेंच्या महिला नेत्यांमध्ये जुंपली

tv9 Special Report | उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. दरम्यान सुषमा अंधारे यांनी केलेल्या या टिकेवर मनसे अन् शालिनी ठाकरे कोणत्या भाषेत उत्तर देणार? बघा स्पशेल रिपोर्ट

Sushma Andhare यांनी पुन्हा डिवचलं, डीजेवरुन मनसे अन् ठाकरेंच्या महिला नेत्यांमध्ये जुंपली
| Updated on: Oct 09, 2023 | 10:49 AM

मुंबई, ९ ऑक्टोबर २०२३ | मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात डीजेवरुन चांगलाच कलगीतुरा रंगलाय. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात मोठा डीजे वाजवला गेला त्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला महत्वाचं आवाहन केलं. डीजे आणि लेझर लाईटमुळे लहान मुलं, वृद्धांना त्रास होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. राज ठाकरेंनी ट्वीटरवरुन आपली भूमिका मांडल्यानंतर सुषमा अंधारे यांनी त्यांना चांगलंच डिवचलं. डीजेवरुन सुरु झालेला शालिनी ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्यातील वाद काही थांबण्याची चिन्ह नाहीत. कारण सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला तर शालिनी ठाकरेंना थेट आव्हानच दिलं. सुषमा अंधारे यांच्या एका वक्तव्यावरुन शालिनी ठाकरे संतापल्या आणि त्यांनी सुषमा अंधारे यांच्या कानाजवळ डीजे वाजवण्याचा इशारा दिला. त्यावर नांदेडच्या मुद्द्यावरुन तुम्ही सरकारच्या कानाजवळ डीजे वाजवण्याची हिंमत कराल का, असा खोचक सवाल अंधारे यांनी केला.

Follow us
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.