अडगळीला पडलेल्या संजय शिरसाट यांना कुणी ओळखत नाही तर..., सुषमा अंधारे पुन्हा भडकल्या

अडगळीला पडलेल्या संजय शिरसाट यांना कुणी ओळखत नाही तर…, सुषमा अंधारे पुन्हा भडकल्या

| Updated on: Apr 03, 2023 | 4:58 PM

VIDEO | शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोप, बघा काय म्हणाल्या सुषमा अंधारे

पुणे : शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना डिवचल्याचे पाहायला मिळाले. संजय शिरसाट म्हणाले, सुषमा अंधारे जे करताय ते सर्व प्रसिद्धीसाठी करत आहेत. यावर सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया देत संजय शिरसाट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘अडगळीला पडलेल्या संजय शिरसाट यांना कुणी ओळखत पण नव्हतं. शिरसाट हे नाव देखील कोणाला माहिती नव्हतं मात्र सुषमा अंधारे यांच्या सोबत चर्चेत नाव आल्याने लोकं त्यांना ओळखू लागले आहेत.’, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्यावर खोचक टीका केली. तर आमदार असूनही संजय शिरसाट यांना त्यांच्या गल्लीत कोणीही विचारत नाही. अशा खालच्या पातळीचं मला बोलायला लावू नका, असेही सुषमा अंधारे आक्रमक होत म्हणाल्या.

Published on: Apr 03, 2023 04:56 PM