Sushma Andhare : ललित पाटीलवर 'या' भाजपच्या नेत्याचा वरदहस्त, थेट नाव घेत सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

Sushma Andhare : ललित पाटीलवर ‘या’ भाजपच्या नेत्याचा वरदहस्त, थेट नाव घेत सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

| Updated on: Oct 13, 2023 | 4:26 PM

VIDEO | ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील या प्रकरणात मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आता थेट भाजप नेत्याचं नाव घेत संशय व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांचा उल्लेख केला आहे.

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३ | ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याच्यावर मंत्री गिरीश महाजन यांचा वरदहस्त असू शकतो, असे म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गिरश महाजन यांच्यावर संशय व्यक्त करत जोरदार निशाणा साधला आहे. यासोबतच ललित पाटील फरार होण्यात भाजपच्या एका मंत्र्याचा हात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. यावेळी ललित पाटील प्रकरणी ससून रूग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर, रोझरी स्कूलचे संस्थापक विनय अरहना, त्यांचा चालक दत्ता डोके आणि ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील यांना सहआरोपी करून त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी रविंद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. भाजपचे आमदार आणि सध्याचे मंत्री ज्यांचा महाराष्ट्रातील गुन्हेगारांमध्ये वर्चस्व आणि वावर आहे. त्यांचाही काही दिवसात याप्रकरणात हात दिसेल, असे म्हणत रविंद्र धंगेकर यांनी संकेत दिले आहेत.

Published on: Oct 13, 2023 04:26 PM