सुषमा अंधारे यांचं राज ठाकरे यांना खोचक पत्र, केले ‘हे’ ६ रोखठोक सवाल; पत्रं लिहिण्याचे कारण काय?
VIDEO | उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या 'त्या' टीकेवर सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहित दिलं प्रत्युत्तर, बघा काय म्हटले पत्रात?
मुंबई : खारघर घटनेप्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. या पत्रातून अंधारे यांनी राज ठाकरे यांना सहा थेट प्रश्न विचारले आहेत. या घटनेवर चार दिवसांनी आपण व्यक्त झालात हे एका अर्थी बरंच झालं. कोरोना हा मानवनिर्मित नव्हता तर तो निसर्गनिर्मित होता, असे म्हणत सुषमा राऊत यांनी राज ठाकरे यांना चांगलेच खडसावले आहेत. कोरोना काळातील कामकाज आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेला सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाच्या काळातही अनेक प्रकारचा हलगर्जीपणा झालेला आहे. तिथेही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आजही भरला जाऊ शकतो. त्यामुळे याचं राजकारण करू नये. हा एक अपघात आहे. या अपघाताचं काय राजकारण करायचं? असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या या विधानाचा सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला आहे. सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी राज ठाकरे यांना सहा सवाल केले आहेत. या पत्रातून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.