Special Report | ... अन् सुषमा अंधारे यांना रडू कोसळलं, शरद पवार यांचा 'तो' किस्सा सांगताना झाल्या भावूक

Special Report | … अन् सुषमा अंधारे यांना रडू कोसळलं, शरद पवार यांचा ‘तो’ किस्सा सांगताना झाल्या भावूक

| Updated on: May 10, 2023 | 7:42 AM

VIDEO | शरद पवार यांच्यासमोर बोलताना सुषमा अंधारे भावूक का झाल्या? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : साताऱ्यातील एका पुरस्कार सोहळ्यानिमित्त शरद पवार, (Sharad Pawar) खासदार श्रीनिवास पाटील, सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि इतर मान्यवर एकाच मंचावर सोबत होते. यावेळी शरद पवार यांचा किस्सा सांगताना सुषमा अंधारे भावूक झाल्यात आणि म्हणाल्या माझ्यावर झालेल्या टीकेच्या वेळेला विरोधकांनी बोलायला हवं होतं, अशी खंत देखील बोलून दाखवली. भारतात भटक्या विमुक्त समाजाची स्थिती, सध्याचं राजकारण, पवारांचा राजीनामा यावर सुषमा अंधारे यांनी मतं मांडली. यावेळी एका घटनेचा उल्लेख करत शरद पवार यांनी तातडीने दखल घेतल्याचे सांगितले. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी आपल्याबद्दल जे अपशब्द वापरले, त्यावेळी विरोधी पक्षाने बोलायला हवं होतं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास संशोधन समाजाचा सोहळा होता. यावेळी अनेक मान्यवर हजर होते. या कार्यक्रमात भटक्या विमुक्तांची स्थिती मांडताना पवारांच्या राजीनाम्यावेळी लिहिलेलं पत्र अंधारे यांनी वाचून दाखवलं… बघा काय होतं ते पत्र…अन् का सुषमा अंधारेंना रडू कोसळलं…

Published on: May 10, 2023 07:41 AM