'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', सुषमा अंधारेंचा रोख कुणावर?

‘लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही’, सुषमा अंधारेंचा रोख कुणावर?

| Updated on: May 09, 2024 | 5:52 PM

'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. लोकं स्वीकारणार नाहीत त्यांनाही खात्री आहे, भाजपने थेट आमच्या सोबतच्या लढती टाळल्या आहेत. आमच्यातून गद्दारी केलेले आहेत त्यांच्यासोबत आमच्या लढती आहेत, गद्दारी करून गेलेल्यांची सगळीकडे गच्छंती होणार'

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेतील नेत्यांवर नाव न घेता खोचक टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. लोकं स्वीकारणार नाहीत त्यांनाही खात्री आहे, भाजपने थेट आमच्या सोबतच्या लढती टाळल्या आहेत. आमच्यातून गद्दारी केलेले आहेत त्यांच्यासोबत आमच्या लढती आहेत, गद्दारी करून गेलेल्यांची सगळीकडे गच्छंती होणार आहे. असं काहीतरी बोलून परतीचे दोर कापून आपल्याला काहीतरी स्कोप मिळू शकतो का..? आता या वाक्याचा काही उपयोग होणार नाही. राम कदम आणि गुलाबराव पाटील यांना मातोश्रीच काय महाराष्ट्राच्या जनतेची सुद्धा इच्छा नाही परत घेण्याची.. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार नेते रामदास कदम आणि गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published on: May 09, 2024 05:52 PM